स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे आणि करू इच्छिणारे विद्यार्थी यांच्यासाठी
नवे पुस्तक: स्पर्धा परीक्षा प्लॅनर: स्पर्धा परीक्षा : संधी ,समस्या आणि आव्हानं
लेखक : राजीव नंदकर अतिरिक्त जिल्हाधिकारी
विद्यार्थी मित्रांना स्पर्धा परीक्षा देताना वेळोवेळी अनेक प्रश्न, समस्या,अडथळे आणि अडचणी येत असतात. या संदर्भात मा. श्री. राजीव नंदकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी ह्यांनी प्रस्तुत पुस्तकाचे लेखन करून विद्यार्थी मित्रांना विशेष व बहुमोल स्वरूपाचा संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून दिला आहे.
या पुस्तकात स्पर्धा परीक्षा सद्यःस्थिती व वस्तुस्थिती, स्पर्धा परीक्षा आकर्षण व संरक्षण ,स्पर्धा परीक्षा वास्तव आणि समज-गैरसमज, अडचणी व समस्या, स्पर्धा परीक्षा मधील संधी ओळखा व आव्हाने पेला, स्पर्धा परिक्षांमधील महत्वच्या २२ संधी अशा विविध विषयांवर विस्तृत माहिती उपलब्ध करून दिली आहे.
स्पर्धा परीक्षेचा निर्णय घेण्यापूर्वी, निर्णय घेतल्यावर आणि प्रत्यक्ष सुरुवात केल्यावर कसे पुढे मार्गक्रमण करावे, वैकल्पिक विषयाची निवड कशी करावी, अभ्यासाचे नियोजन, अभ्यास पद्धती, नोट्स कशा काढाव्यात आणि परीक्षांचे बदलतं स्वरूप काय आहे यावरही पुस्तकात मार्गदर्शन उपलब्ध आहे.
अध्ययन बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता व सामाजिक बुद्धिमत्ता याबाबत माहिती दिली आहे.कष्टाशिवाय यश नाहीच, गुणवत्ता व समर्पण, प्रेरणा व प्रोत्साहन, दहा प्राण्यांचा आदर्श, व्यवस्थापन कौशल्यं, परीक्षार्थीची गुणवैशिष्ट्यं, युवकांमधील तणाव व्यवस्थापन, बी प्लान ही प्रकरणे पुस्तकात समाविष्ट आहेत.
पुस्तकात शेवटी स्पर्धा परीक्षा विश्लेषण, निष्कर्ष आणि समारोप सोबतच नऊ प्रश्नावली दिल्या आहेत की ज्यामुळे विद्यार्थी स्वंय- मूल्यमापन करू शकतील.


Reviews
There are no reviews yet.