आपल्या भारत देशात साडेसहा लाख खेडी आहेत. या गावातील महत्त्वाचा घटक गावचा सरपंच असतो. तोच गाव विकासाचे मुख्य केंद्रबिंदू असतो. मात्र, सरपंच हा फक्त राजकारण करणारा असून चालत नाही, तर तो विकासाची आस बाळगणारा असावा लागतो. आज आपण पाहतोय, शहरे वाढत आहेत. शहरे मोठी नक्कीच व्हावीत, पण प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. आज आपण शहरातून बाहेर पडणाऱ्या लोंढ्यावरून अंदाज लावू शकतो की, शहरांवर किती मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे. त्यामुळे एकीकडे शहरे वाढत असताना गावांकडेही लक्ष असायला हवे. ग्रामपंचायतीने शासकीय निधीवर अवलंबून न राहता गावातील नागरिकांना पायाभूत सुख-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतःचे उत्पन्नाचे साधन निर्माण केले, तरच गावाचा विकास होऊ शकतो. गावात स्वच्छ हवा, वीज, रस्ते, पाणी, आरोग्य व शिक्षण एवढ्या गोष्टी करणे ही सरपंचाची जबाबदारी आहे. सरपंचाला त्याची कामे व कर्तव्ये यांची माहिती असायलाच हवी. गावाची ओळख गावाच्या सरपंचाच्या हातात असते; मात्र गावाला विकासपथावर नेण्यासाठी त्याला ध्येय व उद्दिष्टे ठरवावी लागतात. ग्राम अधिकाऱ्यांनी मनापासून काम केले, तर गावांचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. मात्र, बऱ्याच वेळा सरपंचला, नक्की कसे काम करावे आणि काय वाचावे हेच कळत नाही. अनेक वेळा ऐकीव माहितीवर काम केले जाते. त्यामुळे कामाची आवश्यक ती गती राखता येत नाही आणि पाच वर्षे संपून जातात. हीच बाब मध्यवर्ती ठेवून अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर यांचे ‘गावविकासातून राष्ट्रविकास’ हे पुस्तक गावांचा सर्वसमावेशक विकास साध्य करून देशाचा शाश्वत विकास कसा करावा याबाबत मार्गदर्शन करते. त्यांच्या या पुस्तकात १३८ प्रकरणे समाविष्ट असून, त्यातून त्यांनी गावांचा विकास साधण्यासाठी विस्तृत स्वरूपात माहिती दिली आहे. सरपंच, ग्रामसभा, ग्राम नमुने, ग्राम समित्या, ग्रामविकासाची कामे, ग्राम अधिकारी, लेखा परीक्षण, बँक खाते, गावठाण विस्तार इत्यादी बाबींबाबत पुस्तकामध्ये माहिती समाविष्ट आहे. या पुस्तकात त्यांनी जनसुविधा विशेष अनुदान, वित्त आयोग, जिल्हा वार्षिक योजना, पाणी टंचाई योजना, तीर्थक्षेत्र विकास, पंचवीस-पंधरा योजना, रोजगार हमी योजना, घरकुल योजना, आमचा गाव आमचा विकास योजना इत्यादी योजनांची सखोल माहिती दिली आहे. त्याचसोबत ग्रामविकास साधण्यासाठी इतर आनुषंगिक बाबींचा समावेश, जसे प्लास्टिक बंदी, दारूबंदी, शालेय पोषण आहार, लसीकरण या विषयांचा समावेश पुस्तकात केला आहे. हे पुस्तक ग्रामस्थ, सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवक, कर्मचारी, अधिकारी आणि ग्रामीण भागातील हौशी वाचक यांना उपयोगी ठरणारे असे आहे.
गावविकासातून राष्ट्रविकास
Original price was: ₹400.00.₹320.00Current price is: ₹320.00.

Reviews
There are no reviews yet.