प्रशासन ही पूर्वापार चालत आलेली एक व्यवस्था असून, ती स्थिर आणि साचेबंद असते. सुप्रशासन मात्र एक व्यापक आणि विस्तृत अशी संकल्पना असून, त्यात नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि लाभ यांचे सुलभीकरण साधले जाते. सुप्रशासन ही अशी एक निर्णय पद्धती आणि प्रशासकीय प्रक्रिया आहे की, ज्याद्वारे नागरिकांचे कल्याण आणि सर्वांगीण सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय विकास साधला जातो. सुप्रशासन अस्तित्वात येण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा ही पारदर्शक, कार्यक्षम, परिणामकारक, सुलभ, जबाबदार, उत्तरदायी, विकेंद्रित, सहभागी, सर्वसमावेशक, समन्यायी आणि निर्णयक्षम असावी लागते. सुप्रशासन फक्त देत नाही, तर जे दिले आहे त्यातून अनुरूप आणि आवश्यक बदल झाले का हे पाहते. सुप्रशासन हे कायम लोकोपयोगी आणि लोकाभिमुख असते. भारतीय संविधानाला अपेक्षित असलेले ‘आम्ही भारताचे लोक’ हे तत्त्व सुप्रशासनाच्या माध्यमातूनच साध्य होते. एकंदरीत, सुप्रशासन अस्तित्वात आणण्यासाठी कोणत्या घटकांवर कामकाज करावे याची सखोल आणि विस्तृत अशी माहिती ‘सुप्रशासन : संधी आणि आव्हाने’ हे पुस्तक आपल्याला देते.
Sale!
सुप्रशासन संधी आणि आव्हाने : Suprashasan Sandhi ani Aavhane लेखक राजीव नंदकर
Original price was: ₹249.00.₹200.00Current price is: ₹200.00.
सुप्रशासन अस्तित्वात आणण्यासाठी कोणत्या घटकांवर कामकाज करावे याची सखोल आणि विस्तृत अशी माहिती ‘सुप्रशासन : संधी आणि आव्हाने’ हे पुस्तक आपल्याला देते. सदर पुस्तक हे शासकीय अधिकारी- कर्मचारी आणि स्पर्धा परीक्षा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे आहे.
100 in stock
Reviews
There are no reviews yet.