Sale!

सुखाच्या शोधात : SUKHACHYA SHODHAT लेखक: राजीव नंदकर

Original price was: ₹299.00.Current price is: ₹250.00.

सुखाला मानसशास्त्रीय, तात्त्विक, वैज्ञानिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या पाच विषयांच्या परिप्रेक्ष्यातून कसे समजून घ्यावे, याबाबत या पुस्तकात माहिती दिलेली आहे. सुख हे फक्त एकांगी आणि एकाकी न पाहता, ते व्यापक आणि विशाल दृष्टीने कसे पाहावे, याबाबतचा वस्तुपाठ हे पुस्तक घालून देते.

100 in stock

सुख ही एक सर्वसमावेशक, समग्र, एकात्मिक आणि एकत्रित अशी संकल्पना असून ती व्यक्तिनिष्ठ स्वरूपाची आहे. सुखाच्या शोधात जीवनाची वाटचाल करत असताना, सुखाला मानसशास्त्रीय, तात्त्विक, वैज्ञानिक, सामाजिक आणि आध्यात्मिक या पाच विषयांच्या परिप्रेक्ष्यातून कसे समजून घ्यावे, याबाबत या पुस्तकात माहिती दिलेली आहे. या पुस्तकातून तुम्हाला जीवनात कोणत्या बाबी, गोष्टी आणि घटक यांचा स्वीकार करावा आणि कोणत्या बाबी, गोष्टी आणि घटक यांचा त्याग करावा, याबाबतचे मार्गदर्शन मिळेल. सुख चिरकाल टिकवायचे असेल, तर त्याची व्यापकता आणि सखोलता कशा प्रकारे समजून घ्यावी, याबाबतचे विवेचन या पुस्तकात दिलेले आहे. ज्ञान, कौशल्ये, अनुभव आणि दृष्टिकोन यांचा समन्वय साधून सुखाचा शोध कसा घ्यावा, याचे सुंदर निरूपण या पुस्तकातून आपणास प्राप्त होते. सुख हे फक्त एकांगी आणि एकाकी न पाहता, ते व्यापक आणि विशाल दृष्टीने कसे पाहावे, याबाबतचा वस्तुपाठ हे पुस्तक घालून देते. पुस्तकात नमूद बाबींची आणि घटकांची दैनंदिन आयुष्यात अंमलबजावणी केली की, तुम्ही खात्रीशीरपणे एक साधे, सोपे, सरळ, सुटसुटीत आणि सुखी आयुष्य जगण्यास सुरुवात करता, एकंदरीत, वस्तुनिष्ठ, शाश्वत आणि निरपेक्ष अशा सुखाचा शोध, हेच ‘सुखाच्या शोधात’ या पुस्तकाचे सार आहे. 

Weight .300 kg
Dimensions 20 × 5 × 20 cm
वाचनीय आणि सुबक

पुस्तकात एकूण 248 पाने आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सुखाच्या शोधात : SUKHACHYA SHODHAT लेखक: राजीव नंदकर”

Your email address will not be published. Required fields are marked *