चारा छावणी : Chara Chavani लेखन शब्दांकन आणि संकलन राजीव नंदकर

चारा छावणी बाबत इत्यंभूत माहिती देणारे हे एकमेव पुस्तक असून निश्चितच पुढील काळात हे पुस्तक चारा छावणी चालक व महसूल अधिकारी यांचेसाठी मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे .

सन २०१२ या वर्षातील मराठवाड्यातील दुष्काळात चारा  छावण्या उघडण्यात आल्या होत्या, परंतु चारा  छावणी या विषयाबाबत असणारे ज्ञान अपुरे असल्याने व व्यवस्थापनाबाबत  माहिती नसल्याने अनेक चारा  छावण्या ह्या वादात अडकल्याचे चित्र आपणास पहावयास मिळाले .अनेक चारा छावण्याची तपासणी वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली.सदर पुस्तिका मध्ये राजीव नंदकर यांनी आपला जालना जिल्यातील चारा छावणी व्यवस्थापनबाबतचा अनुभव पणाला लावला आहे . सदर पुस्तिका पहिली असता ती  मध्ये चारा  छावणी संस्थेची निवड,आवश्यक कागदपत्रे ,चारा छावणी चालकाकडील नोंदवह्या छावणी तील जनावारचे खाद्य ,जनावरांची काळजी ,चारा  छावणी रचना, पाणी,खनिज मिश्रण, निवारा, वीज ,आरोग्य ,अनुदान, मनुष्यबळ यावर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले आहे.या पुस्तकात विविध नमुने फॉर्म्स उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामध्ये शेतकऱ्यांचा अर्ज, करार पत्रक, चारा  कार्ड ,जनावरे संख्या कळवण्याचा  दैनंदिन अहवाल ,निधी मागणी अहवाल ,चारा  छावणी तपासणी फॉर्म्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत . तसेच जनावरे  आवक नोंदवही, चारा  वितरण वितरण नोंदवही ,जनावरे हालचाल नोंदवही ,धनराशी नोंदवही, जनावरे लसीकरण नोंदवही याबाबतही माहिती देण्यात आलेली आहे.पुस्तकाच्या शेवटी चारा छावणी बाबत प्रकल्प अहवाल व चारा छावणी आदेश देण्यात आला आहे. हे पुस्तक सचित्र असून आवश्यक त्या ठिकाणी फोटो देण्यात आलेले आहेत .चारा छावणी बाबत इत्यंभूत माहिती देणारे हे एकमेव पुस्तक असून निश्चितच  पुढील काळात हे पुस्तक चारा छावणी चालक व महसूल अधिकारी यांचेसाठी मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आहे .

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “चारा छावणी : Chara Chavani लेखन शब्दांकन आणि संकलन राजीव नंदकर”

Your email address will not be published. Required fields are marked *